मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी

मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी;

मूर्तिजापूर प्रतिनिधी – ग्रामीण भागातील वीज ग्राहकांवर होणारा अन्याय थांबवावा आणि त्यांचे

वीजबिल तातडीने निम्मे करावे, अशी ठाम मागणी रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत इंगळे यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ही मागणी त्यांनी मूर्तिजापूरचे उपकार्यकारी अभियंता अभय कदम यांच्या माध्यमातून लेखी निवेदनाद्वारे केली.

Related News

प्रशांत इंगळे यांनी पत्रात नमूद केले की, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर त्याचे दुरुस्ती कार्य वेळेत होत नाही.

महावितरणचे कर्मचारी कामात टाळाटाळ करतात, त्यामुळे नागरिकांना दीर्घ काळ अंधारात राहावे लागते.

यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे.वीजबिल

यासोबतच ग्रामीण भागातील वीज पोल पूर्णपणे मोडकळीस आलेले असून, त्यांची तातडीने दुरुस्ती करावी,

अशी मागणीही करण्यात आली आहे. महावितरणकडून ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळत नसल्याचा आरोप करत,

प्रशांत इंगळे यांनी या समस्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.

Related News