३८ वर्ष आरोग्य सेवा दिल्यानंतर वृंदा विजयकर यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा पार पडला

३८ वर्ष आरोग्य सेवा दिल्यानंतर वृंदा विजयकर यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा पार पडला

पिंजर प्रतिनिधी | १ जुलै २०२५

ग्रामीण आरोग्यसेवेत ३८ वर्ष निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य सहायिका वृंदा विजयकर यांचा अकोला

जिल्हा नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.

Related News

बाळापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पारस येथे कार्यरत असलेल्या वृंदाताई ३० जून २०२५ रोजी नियत वयानुसार सेवानिवृत्त झाल्या.

त्यांच्या समर्पित सेवेसाठी पारस येथे आयोजित सत्कार समारंभात जिल्हा सल्लागार सलोनी पोटे अध्यक्षस्थानी होत्या,

तर संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीताताई जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

या प्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष मंगलाताई तितुर आणि जिल्हा सदस्य अनिता इंगळे यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमात वृंदाताईंनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगून उपस्थितांचे मन जिंकलं.

“वृंदाताई विजयकर यांचं कार्य ग्रामीण आरोग्य सेवेसाठी दीपस्तंभासारखं आहे,”

अशा शब्दात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

Read Also : https://ajinkyabharat.com/manbha-campus/

Related News