पतंजली फूड लिमिटेड, वाशीम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पतंजली फूड लिमिटेड, वाशीम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

वाशीम | २१ जून २०२५

आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली फूड लिमिटेड, वाशीम येथे विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले.

यंदाचा योग दिन ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित होता.

Related News

या थीमद्वारे संपूर्ण मानवजातीसाठी योगाच्या महत्त्वावर भर देण्यात आला.

कार्यक्रमात योग शिक्षिका नीता भांडेकरडॉ. संतोष भांडेकर यांनी कर्मचार्‍यांना योगाचे धडे दिले

आणि योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. विविध आसनांचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवले.

यावेळी युनिट प्रमुख सचिन ओझा, मानव संसाधन प्रमुख रवींद्र येवतकर, कमर्शिअल प्रमुख विजय वर्गीय,

गुणवत्ता नियंत्रण प्रमुख अमोल केंकरे, उत्पादन प्रमुख निलेश जोशी, इलेक्ट्रिक प्रमुख पी. सी. पटेल, स्टोअर

प्रतिनिधी प्रेम आर्या, सुरक्षा प्रमुख शिवम सैनी, एचआर प्रतिनिधी अमित शर्मा, रमेश पाटील,

अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले.

Read Also : https://ajinkyabharat.com/wp-admin/post-new.php

Related News