इंझोरीत अजूनही पावसाची प्रतीक्षा; सिंचनावरच पेरलेले बियाणे उगमाच्या वाटेवर

इंझोरीत अजूनही पावसाची प्रतीक्षा; सिंचनावरच पेरलेले बियाणे उगमाच्या वाटेवर

इंझोरी प्रतिनिधी | जून 2025

इंझोरी परिसरात अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मृग नक्षत्राचा शेवट समीप असूनही ढगांकडून समाधानकारक पावसाची हजेरी लागलेली नाही.

Related News

यामुळे कोरडवाहू शेतकरी चिंतेत असून त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे, त्यांनी मात्र पेरण्या सुरू ठेवत तुषार सिंचनाचा

वापर करून बियाण्यांना अंकुरण्यासाठी आवश्यक ते पाणी देणे सुरू ठेवले आहे.

परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून होत असला तरी तो पुरेसा ठरत नाही.

काही शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसावर विश्वास ठेवत पेरण्या करून घेतल्या असल्या तरी पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची नितांत गरज आहे.

दुसरीकडे, अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्या रखडवून ठेवल्या आहेत.

सध्याच्या स्थितीत पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे संकट अधिकच गंभीर होत आहे.

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने लवकरच पावसाचा जोर

वाढण्याची शक्यता वर्तवली असली तरी तो प्रत्यक्षात कधी येईल याचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/popatkhed-district-council-shahet-international-yoga-day/

Related News