१६ वर्षाच्या तरुणाच्या हुशारीमुळे रेल्वे अपघात टळला; शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

१६ वर्षाच्या तरुणाच्या हुशारीमुळे रेल्वे अपघात टळला; शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

उन्नाव (उत्तर प्रदेश) – उन्नावमधील सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ १६ वर्षीय श्रीजन मिश्राच्या प्रसंगावधानामुळे

मोठा रेल्वे अपघात टळला. खचलेला ट्रॅक आणि समोरून भरधाव

वेगाने येणारी कानपूर-बलमाऊ पॅसेंजर ट्रेन पाहून श्रीजनने

Related News

आपला लाल रंगाचा टी-शर्ट फडकवून ट्रॅकवर इशारा केला.

लोको पायलटने वेळीच ब्रेक लावल्याने ट्रेन थांबवता आली.

यानंतर रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आले आणि ट्रॅक दुरुस्तीनंतरच ट्रेन पुढे रवाना झाली.

श्रीजनच्या हुशारीचं सर्वत्र कौतुक होत असून रेल्वे प्रशासनानेही त्याच्या शौर्याची दखल घेतली आहे.

ग्रामीण भागातील युवकाच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

Read Also :  https://ajinkyabharat.com/international-yoga-day-21-june/

Related News