दोन गटात तुफान हाणामारी ; ३७ जणांवर गुन्हे दाखल

दोन गटात तुफान हाणामारी ; ३७ जणांवर गुन्हे दाखल

वाशीम //

दोन गटातील संतप्त युवकांनी हातात तलवारी घेऊन एकमेकांवर तुफान दगडफेक केली .

सदर घटना शहरातील राजनी चौक जवळच असलेल्या बाळसमुद्र मंदिराजवळ १९ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली.

Related News

या घटनेतील २२ आरोपींचा पोलीसांनी शोध लावला असून इतर १५ जणांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान , पोलिसांनी दोन्ही गटातील ३७ जणांविरुद्ध आर्म ऍक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे .

प्राप्त माहितीनुसार वाशीम शहरातील विविध भागात राहत असलेल्या दोन गटामध्ये सोशल मीडियाच्या पोस्ट वरून चिथावणी देण्यात आली.

त्यानंतर राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोशल प्लॅटफॉर्म वरून दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांना चीड येईल

अशा पोस्ट करून चिथावणी दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चिथावणीखोर पोस्ट मुळे दोन्ही गट रात्री ९ वाजताच्या सुमारास

बाळ समुद्र मंदिराजवळ एकमेका समोर आले.

दोन्ही गटातील काही जणाजवळ तलवारी तर काहीजवळ काठ्या आणि इतर धारदार शस्त्रे असल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.

दोन्ही गटातील जवळपास ४० ते ५० तरुण यांनी परिसरामध्ये धारदार शस्त्रासह सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण होईल असे प्रदर्शन केले.

या घटनेची माहिती वाशीम पोलीस स्टेशनला प्राप्त होताच शहर पोलीसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

आणि परिस्थिती नियंत्रणात आणली .

यावेळी पोलिसांना २० ते २५ वयोगटातील लोक हातामध्ये लोखंडी पाईप, काठ्या व तलवारी घेवुन सज्ज होवुन व

दगडफेक करतांना दिसले. तसेच जोरजोरात मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन संपुर्ण परिसरात दहशत पसरवुन सार्वजनिक शांतता बाधीत करीत होते.

पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी दोन्ही गटातील आरोपी सैरावैरा पळत एकमेकांवर दगडफेक करीत होते.

वाशीम शहर पोलीस पोहचताच सर्व लोक आजुबाजुला पळुन गेले.

त्या ठिकाणी भांडन करणा-या दोन्ही गटामधील लोकांची नावांची माहीती गोळा केली .

सदर घटनेतील ३७ जणांपैकी २२ जणाचा शोध लागला. त्यामध्ये कुणाल रोडगे , प्रबल अहिर , अभिषेक उलेमाले , सचिन कोठेकर , रामा इंगळे ,

राहुल ठाकरे , आकाश गवळी , विश्वेश लेनगुते , अक्षय बेलपत्रे , विष्णु पवार , वैभव गुंजकर , विरेंद्र खडसे , प्रियांशु दावणे ,

निलेश नकवे , रोहन समुद्रे , रितिक समुद्रे , राहुल उसरे , शुभम नकवे , सोमेश उलेमाले , अभय उलेमाले ,

रुषी गाभणे आणि अजय गोरे सर्व रा. वाशीम यांचा समावेश आहे.

या सर्व आरोपींनी आपसात दगडफेक भांडनतंटा करुन परिसरात दहशत निर्माण करुन सार्वजनिक शांतता भंग केली.

त्यांच्या या कृत्यामुळे आजुबाजुच्या सर्व सामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण झाल्याने त्यांनी आपली दुकाणे, घरे बंद करुन घेतली

व येणा-या जाणा-या लोकांमध्ये भिती निर्मान होवुन दहशतीचे वातावरण तयार केले.

सदर परिसरातील शांतता भंग करून दहशत निर्मान केली , कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान केला आहे.

अशा फिर्यादीहून उपरोक्त आरोपी विरुद्ध कलम 194(2), 189(2), 189(4), 190,191(2), 191(3) भारतीय न्याय संहीता,

सहकलम 7 क्रिमीनल लॉ अँमेटमेंट 1932, सहकलम 4,25 आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव करीत असून सद्यस्थितीत शुक्रवार पेठ परिसरात शांतता आहे .

Read Also :  https://ajinkyabharat.com/nation/

Related News