सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला अटक

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला अटक

कारंजा, दि. १९

कारंजा शहर पोलिस स्टेशन येथे १८ जून रोजी फिर्यादि लखन अजय शिवहरे(३०)

रा . सिंधी कँम्प तुळजाभवानी नगर कारंजा लाड ता . कारंजा जि वाशिम यांनी रिपोर्ट दिला की,

Related News

१० जून रोजी फिर्यादी यांचे घरा समोर भजनाचा कर्यक्रम असल्याने त्यांचे घरातील आई व फिर्यादी असे घराबाहेर गेले

असता फिर्यादी यांचा मोठा भाऊ श्याम अजय शिवहरे हा घरीच हजर होता . त्या दरम्याण रात्री अंदाजे ९ वाजताचे दरम्यान घरात

कोणी नसल्याचे पाहुन आरोपी श्याम अजय शिवहरे याने त्याचे भावाने एका बँग मध्ये ठेवलेल्या दोन सोण्याच्या अंगठ्या

कि . अं . १,३५०० रुपयेचा मुद्दमाल चोरुन नेला असा दाट संशय फिर्यादी यांनी दाखविला अशा फिर्यादी चे जबानी रिपोर्ट वरुन आरोपी

विरुद्ध कलम ३०५ बि . एन . एस प्रमाने गुन्हा दाखल करून पो . नि. दिणेशचंद्र शुक्ला यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन तपास पथकास

आरोपी शोध कामी रवाना केले . सदर गुन्हयाचे तपासा दरम्याण पो.हवा. ऊमेशकुमार बिबेकर यांना मिळालेल्या माहीती वरुन संशयीत

आरोपी याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने

सदर गुन्हयात गेलेला चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.ह्या गुन्हाचा तपास पोलिस अधिक्षक अनुज तारे , अप्पर पोलिस

अधिक्षक फड मँडम, उपविभागिय पोलिस अधिकारी प्रदिप पाडवी , पोलिस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांचे मार्गदर्शनात ,

पोहवा ऊमेशकुमार बिबेकर , पो.हेका. गणेश जाधव , मयुरेश तिवारी , अमित भगत , अनिस निन्सुरवाले .

मोहम्मद परसुवाले , पो.काँ. नितीन पाटील यांनी केला असुन पुढील तपा पोहेका उमेशकुमार बिबेकर हे करीत आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/horn-vajavanyavaron-suit-vikopala-knife/

Related News