अल्पवयीन मुलीला प्रेम जाळ्यात अडकवून अत्याचार व मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल!

अल्पवयीन मुलीला प्रेम जाळ्यात अडकवून अत्याचार व मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल!

अकोला:- अल्पवयीन मुलीशी लगट साधून तिला आपल्या प्रेम झालात अडकवून त्यानंतर

तिच्याशी केलेल्या शारीरिक संबंधाचे चित्रण करून त्या भरोशावर तिला ब्लॅकमेल व मारहाण

करणाऱ्या चौघांविरुद्ध खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू

Related News

असलेले हे प्रकरण बारा तासानंतर शांत झाले चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

लव्ह सेक्स आणि धोका असाच काहीसा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे.

एका अल्पवयीन तरूणीला शेजारीच राहाणाऱ्या तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

विशेष म्हणजे हो दोघे ही अल्पवयीन आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर या तरुणाने मुली बरोबर शरीर संबध प्रस्थापित केले.

यावेळचे फोटो आणि व्हिडीओ ही त्याने काढून ठेवले होते. त्या माध्यमातून तो त्या मुलीला सतत ब्लॅकमेल करत होता.

त्यात तिचे शोषण तो करत होता. यातूनच या तरुणाने त्या तरूणीचे अश्लील फोटो इन्स्टावर व्हायरल केले.

त्यानंतर या तरुणीच्या पाया खालची वाळू सरकली.

तू दुसऱ्यां बरोबर का बोलते. माझ्या बरोबर संबंध का ठेवत नाहीत.

शरीर सुख का देत नाही यामुळे तो तिचा सतत छळ करत होता.

शिवाय तिला मारहाण ही करत होता. एक दिवस तो तिला एका निवांत ठिकाणी घेवून गेला.

तिथे त्याचे मित्र ही होते. त्यावेळी त्याने त्या अल्पवयीन तरूणीला मारहाण ही केली.

त्याचा व्हिडीओ ही त्याच्या मित्रांनी तयार केला. तो व्हिडीओ ही व्हायरल झाला आहे.

तो नेहमी तिला आपल्याशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता.

नाही तर ते फोटो व्हायरल करेन अशी धमकी ही देत होता.

शेवटी त्याने नको ते केलेच. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

याची माहिती त्या तरूणीला मिळाली. तिने तातडीने ही बाबत आपल्या आईला सांगितली.

आईने त्याच वेळी एका सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेतली.

झालेला प्रकार आईने त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर घातला.

त्याने तातडीने त्यांची मदत केली. पीडीत मुलीला घेवून ते अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्यात गेले.

त्यांनी झालेली हकीकगत पोलिसांना सांगितली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनीही तातडीने गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपींकडून त्या पीडितेला मारहाण करत शोषण केल्याची घटना समोर आली आहे.

याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर पिडीतेचे अश्लील फोटोही व्हायरल करण्यात आले आहेत.

एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडितेच्या आई कडून अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली

असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

दरम्यान आरोपी अल्पवयीन तरूणाने आणखी एका मुलीला फसवले असल्याचंही समोर येत आहे.

पण याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. उपरोक्त प्रकरणात खदान पोलिसांनी चौघांविरुद्ध बलात्कार,

जातिवाचक शिवीगाळ, मारहाण करणे, पोक्सो कायद्यांतर्गत विविध कलमाने गुन्हे दाखल केले असून आरोपींना तातडीने अटक करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असे नृत्य या मंडळींनी केल्यामुळे समाजात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

यामधूनच दोन समाजात तीळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस या प्रकरणावर कटाक्षाने लक्ष देऊन

आहेत या अरबी पैकी काही आरोपी अल्पवयीन असून उर्वरित आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

एसपीनीं घेतला आरोपीचा समाचार

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक रुजू झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळात ही गंभीर घटना घडली आहे.

त्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले असून आरोपींना तातडीने जेरबन करण्याचे निर्देश दिले होते

तसेच सर्व आरोपींना बुधवारी सायंकाळी आपल्या कक्षात बोलवून घेऊन त्यांचा चांगला समाचार घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/shegav-talukyaya-jilaha-madhe-shokaka-shahidala-dili-manandana/

Related News