खुदांवपुर बंधाऱ्याची दुर्दशा! निकृष्ट कामगिरीमुळे एक महिन्यातच पावसात वाहून गेला बंधारा

खुदांवपुर बंधाऱ्याची दुर्दशा! निकृष्ट कामगिरीमुळे एक महिन्यातच पावसात वाहून गेला बंधारा

लाखपुरी | १८ जून

मुर्तिजापूर तालुक्यातील खुदांवपुर येथील शेतकरी गजानन भगवान गवई यांच्या शेतात शासनाच्या माध्यमातून बांधण्यात

आलेला बंधारा अवघ्या एका महिन्यातच पावसात वाहून गेला. निकृष्ट दर्जाचे बांधकाम,

Related News

योग्य पेचेस न लावणे आणि केवळ मातीचा वापर केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बंधाऱ्याच्या खराब कामाविरोधात गवई यांनी संबंधित ठेकेदाराकडे वारंवार तक्रार केली,

मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी ही तक्रार थेट उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे दाखल केली आहे.

“ठेकेदारावर कारवाई करा, बंधारा दुरुस्त करा!” – शेतकऱ्यांची मागणी

या प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्या मीनल नवघरे यांनी देखील शासनाकडे संबंधित

ठेकेदारावर कारवाई करण्याची आणि शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही

शेतकऱ्यांची तक्रार असूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाची

पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bjp-masterplon-ughd-mahavikas-agadil-bade/

Related News