अजिंक्य भारत प्रतिनिधी जानोरी मेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील मोखा गट ग्रामपंचायत जानोरी मेळ मधील वार्ड क्रमांक दोन मध्ये देवराव पर घर मोर यांच्या
घरासमोरून जानोरीमेळ या गावांमध्ये मेन रोड जातो त्या रोडवरती वार्ड क्रमांक एक च्या मध्ये फेर ब्लॉगचे नुकतेच काम झालेले आहे.
Related News
त्यामुळे त्यांच्या घरासमोर एक खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यावरती लक्ष देण्यासाठी वार्ड क्रमांक दोनचे सदस्य हरिभाऊ तायडे यांना
बोलवून तसेच वार्ड क्रमांक एक चे सदस्य पती राजेश काळे यांना बोलवून सदर बाब लक्षात आणून दिली ही बाब
दिनांक 29 मे 2025 ला असता ग्रामपंचायत कर्मचारी किशोर बागडे यांच्याकडे अर्ज दिला होता त्या अर्जावरती ग्रामपंचायत प्रशासनाचे
असे म्हणणे आहे की जोपर्यंत वसुली होत.
नाही तोपर्यंत त्या खड्ड्यात मुरूम टाकल्या जाणार नाही सदर मुरूम टाकण्यासाठी अर्जदाराने ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती केली
की मी माझ्याकडे जो ग्रामपंचायतीचा कर बाकी आहे तो भरण्यासाठी मी तयार आहे तरीही सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन
त्यावरती मुरूम टाकण्यासाठी तयार नाही गेल्या 17 दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे व 17 दिवस झाले अर्ज दिलेला आहे.
त्या अर्जा वर अद्याप काहीच कार्यवाही ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली नाही सदर ग्रामपंचायत ची फक्त मासिक मीटिंग कागदोपत्री होते.
ही बाब खूप गंभीर आहे असे होता कामा नये याकरिता दोन्ही गावांमध्ये जे प्रश्न उद्भवत आहेत ते प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाने सोडवावे तसेच दोन्ही
गावातील नाल्यांचे साफसफाई सुद्धा अद्याप पर्यंत झालेली नाही पावसाळा सुरू झालेला आहे.
तरी या जानोरी मेळ गावातील 31 स्ट्रीट लाईट चे पोल आहेत त्यापैकी फक्त दहा-बारा स्ट्रीट लाईट चालू आहे पावसाळ्यामध्ये विंचू काटा तसेच
सापाची भीती असते सिद्धार्थ पर घर मोर गुरुजी तसेच मोखा गावातील दिगंबर तायडे यांच्या घरासमोर एक रफ्ता बांधलेला आहे.
त्या रपट्यावरती खूप मोठा खड्डा पडलेला आहे येण्या जाण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे ही बाब ग्रामपंचायतच्या लक्षात आली असून तरीही यावर कार्यवाही शून्य आहे.
ग्रामपंचायत प्रशासन नेमके काय करत आहे हे अद्याप कुणालाच काही समजलेले नाही ज्यांचे चांगभले होत आहे.
ते मुंग गिळून चूप आहेत आणि ज्यांच्या वार्डात कामच होत नाही ते नागरिक मात्र वारंवार फक्त चर्चा
करतात सांडपाण्याचे नियोजन अजिबात झालेले नाही असे अनेक प्रश्न ग्रामपंचायत मध्ये आहेत .
ते प्रश्न सोडवण्यासाठी नेमके कोण पुढे येणार हे अजून पर्यंत स्पष्ट झालेले नाही जोपर्यंत ग्रामपंचायतला कर प्राप्त होत.
नाही तोपर्यंत ही कामे अशाच पद्धतीने होणार आहेत असे म्हणणे ग्रामपंचायत प्रशासनाचे आहे.
दर महिन्याला 25 ते 30 तारखेच्या दरम्यान फक्त कागदोपत्री मासिक मीटिंग घेतल्या जाते .
त्यामध्ये नेमके कुठले निर्णय घेतले जातात व नागरिकांच्या भल्यासाठी काय केल्या जाते हे अद्याप स्पष्ट कधीही
झालेले नाही व केव्हा होणार हे सुद्धा माहिती नाही तरी ग्रामपंचात प्रशासनाने पुढाकार घेऊन दोन्ही गावातील
जे प्रश्न उद्भवलेले आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडवावे अशी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
सदर बाब जिल्हा परिषद सदस्य पती संजय बावणे ज्या दिवशी तीन पत्रे उडाले त्या दिवशी त्यांना ही बाब दाखवण्यात आलेली आहे.
त्यांनी ही बाब सरपंच पती यांच्या लक्षात आणून दिली व त्यावर लवकरच तोडगा काढू असे सरपंच पतीने आश्वासन दिलेले आहे .
(सदर छायाचित्रांमध्ये जिल्हा परिषद सदस्य पती संजय बावणे व सरपंच पती व सामाजिक
कार्यकर्ते बाबाराव बागडे ग्रामपंचायत कर्मचारी किशोर बागडे तसेच सुधाकर खोटरे दिसत आहे)
ग्रामपंचायतला जोपर्यंत नागरिक घरटेक्स पाणी टॅक्स भरत नाही तोपर्यंत मुरूम टाकण्यात येणार
नाही सामान्य फंडामध्ये काही पैसे नाहीत त्यामुळे हे प्रश्न उद्भवत आहे लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार आहे (ग्रामसेवक के एस कौस्ककार)
ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार देवराव परघर मोर यांनी सांगितले व माझ्याकडे सुद्धा ते दोन ते तीन वेळा आले व मला सुद्धा ही बाब लक्षात आणून दिली.
मी ही बाब सदर ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिलेली आहे सरपंच ग्रामपंचायत चे सर्व सदस्य यांना ही मी बाब समजावून सांगितलेली आहे.
