मुंबई |
मुंबईत आणि उपनगरांत गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
लोअर परळ, दादर, वरळी, चर्चगेट, सायन, कुर्ला, घाटकोपर परिसरांत
पावसासह विजांचा कडकडाट देखील सुरू आहे.
हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, ४० ते ५० किमी
प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. काही भागांत वादळी
वारे आणि जोरदार ते अतितीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेने नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला दिला आहे.
मुंबईकरांनो, सध्याच्या हवामानाचा विचार करता सावध राहा आणि सुरक्षित ठिकाणीच थांबा.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-municipal-council-kriti-arakhadyat-jilhiyatun-first/