अकोट
शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे
व शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Related News
या शिबिराला १७२ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान करून समाजसेवेचे भव्य उदाहरण सादर केले.
या शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. ‘८०% समाजकारण आणि २०% राजकारण’ या बाळासाहेब
ठाकरे यांचे धोरण या कार्यामध्ये प्रभावीपणे उतरविण्यात आले.शिबिराची सुरुवात कॅप्टन सुनील डोबाळे
यांनी सहपत्नी रक्तदान करून केली. त्यानंतर माजी आमदार संजय गावंडे यांनी आपल्या मुलासह,
तसेच उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनीही आपल्या मुलांसह रक्तदान केले. यावेळी आमदार नितीन
देशमुख यांच्या पत्नी सौ. प्रांजलीताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमास कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे, ज्येष्ठ शिवसैनिक साहेबराव भगत, नगरसेविका विजया बोचे,
महिला आघाडीच्या संगीता राठोड, तालुकाप्रमुख ब्रम्हा पांडे, मा जि ,प सदस्य जगणं निचळ सहकार सेनेचे प्रा. अतुल म्हैसने,
शहरप्रमुख अमोल पालेकर, ऍड. मनोज खंडारे, सुनील रंधे, सुरेश मामा बॉंडे, विक्रम जायले, डॉ. प्रमोद चोरे,
डॉ. गजानन महल्ले, गोपाल सपकाळ, डॉ. गुंजन वालसिंगे आणि विजय बेदरकर डॉ सुहास कुलट हे मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही उल्लेखनीय उत्साह दिसून आला.या कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी आयोजनासाठी
उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्यासह अमोल पालेकर,अक्षय घायल,विजय ढेपे,रमेश पाटील खिरकर,प्रा.प्रवीण बोंद्रे,सुभाष सुरत्ने कमल वर्मा,
नितीन गोंडागरे प्रणव चोरे,आदित्य गणगणे,बादल अहिर,गोपाल विखे,गणेशराव चिकटे,शेख ख्वाजा,नंदू कुलट,
अनिल ढोबळे,अंकुश कुलट,विठ्ठल चौधरी,पवन बांकुवाले,बंडू बोरोकार,शैलेश इंगोले,आकाश बरेठिया,पप्पू थोरात,
विजय कुलट,विजय चंदन, संकेत राऊत,दिनेश बोचे,ओम गावंडे,अद्वैत बोचे,भिकू गटकळ,विजय कांगळे,गजानन चौधरी,
साहिल सराफी,सुमित मोटवाणी,प्रशांत येऊल,नदीम सेठ,अतिक भाई,आजम भाई,जयेश भाखरवाले,मुकेश ठोकळ,
श्रीकांत कांबे,अनिकेत माने,भुजिंगराव शिवरकर अचाल बेलसरे, विलास जाधव,आनंद गुप्ता,अनिल नारे,रमेश खिरकर,
आकाश जाधव,उमेश मोरे,पप्पू पुंडकर,अभिषेक डिक्कर,सुरज कहार,गौतम दामोदर,दर्शन सोनेकर,अक्षय बोडडे,
रोशन कमलाकर,अनिकेत मंडळे,गुना बांकुवले शुभम जाधव,प्रफुल्ल बोरकुटे,प्रफुल म्हैसने आदित्य लाहवरेयासह असंख्य
कार्यकर्त्यांनी मोलाचा सहभाग घेतला.रक्तसंकलनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय,
अकोला,अकोला डायग्नोस्टिक ब्लड सेंटर,आणि कम्युनिस्ट युनिट रक्तपेढी यांच्या सहकार्याने ही सेवा राबविण्यात आली.
या उपक्रमामुळे आमदार नितीन देशमुख यांच्या सामाजिक बांधिलकीची ठसठशीत जाणिव निर्माण झाली असून,
अशा उपक्रमांतून समाजमन जिंकणारे विधायक कार्य घडत असल्याचे शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-machchisath-complex-bus-and-motorcycle/