कर्नाटक | 4 जून 2025
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावत इतिहास रचला.
मात्र या आनंदाच्या क्षणी दोन हृदयद्रावक घटना घडल्या ज्या सर्वांना धक्का धक्का देण्यासारख्या आहेत.
Related News
डाळ शिजण्यापूर्वी चिंच घालता? मग ही मोठी चूक आजच थांबवा!
72 मिलियन फॉलोअर्स असलेलं सलमान खानचं अकाउंट गायब , पापाराझी वादानंतर चाहत्यांमध्ये खळबळ
-
By
Vivek Raut
बेळगावमध्ये विजयाच्या जल्लोषात चाहत्याचा मृत्यू
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अवाराडी गावात RCB चा विजय साजरा करताना 25 वर्षीय मंजुनाथ कुंभार या तरुणाला
हृदयविकाराचा झटका आला. डान्स करताना तो अचानक कोसळला आणि बेशुद्ध पडला.
काही वेळात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
शिवमोगामध्ये अपघातात दुसऱ्या चाहत्याचा मृत्यू
दुसरी घटना शिवमोगा जिल्ह्यात घडली. येथे RCB चा विजय साजरा करताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात जयनगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका चाहत्याचा मृत्यू झाला. जल्लोषाचा क्षण अचानक शोकांतिका बनला.
RCB ने रचला इतिहास – पहिली ट्रॉफी जिंकली
RCB ने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर 6
धावांनी विजय मिळवून आयपीएल 2025 चे जेतेपद पटकावले.
याआधी संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता, पण विजेतेपद हुलकावणी देत होते.
यंदा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने अखेर ट्रॉफी जिंकली.
विराट कोहलीच्या निवृत्तीपूर्वी त्याने संघासाठी ट्रॉफी उंचावली, ही चाहत्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली.
आनंदाच्या क्षणात दोन तरुण जीव गेल्याने RCB चाहत्यांमध्ये दुःख आणि सुन्नतेचे वातावरण आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/bangalore-middle-rcb-rcb-chi-victory-parade-midning-seven-lokancha-dies/