शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सलग 56वे वर्ष असून,
यामध्ये 700 हून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत.
रथ, मेणा, अश्व, टाळकरी, पताकाधारी अशा पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत,
“जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते” व “श्रीहरी विठ्ठल”
या नामजपाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे मंगल प्रस्थान झाले.
टाळ-मृदंगाच्या निनादात, भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला.
श्रीची पालखी तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करत सुमारे 725 किलोमीटरचे अंतर पार करून
4 जूलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूरमध्ये 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान
श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा मुक्काम असणार आहे.
परतीचा प्रवास 10 जुलै रोजी सुरू होणार असून, पंढरपूर ते शेगाव हे सुमारे 550 किलोमीटरचे
अंतर पायी पार करून, 30 जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम केल्यानंतर,
31 जुलै (गुरुवार) रोजी श्रीची पालखी शेगावला पोहोचणार आहे.
एकूण 1300 किलोमीटरचा पायी प्रवास भक्तिभावाने करणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा ठरणार आहे.
READ MORE HERE https://ajinkyabharat.com/balapuramadhil-three-rahivashancha-death/