“फायदा करून देणार 100 टक्के…”

“फायदा करून देणार 100 टक्के…

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर

यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,

Related News

त्यामध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये “या प्रकरणातून माझं नाव काढा” असे सुपेकर एका

अधिकाऱ्याला सांगताना ऐकू येत असल्याचे दमानिया यांचे म्हणणे आहे.

तसेच, हगवणे कुटुंबीयांनी घरातील सुनांवर दबाव टाकण्यासाठी सुपेकर

यांचे नाव घेतल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

सुपेकर व हगवणे कुटुंबीयांमधील कथित जवळच्या संबंधांविषयीही

दमानिया यांनी संशय व्यक्त केला. ही ऑडिओ क्लिप ऐकवताना त्यांनी सुपेकर यांच्यावर गैरवर्तन,

हस्तक्षेप आणि प्रशासनात बेजबाबदारपणाचे आरोप केले.

Read Also : https://ajinkyabharat.com/epfo-cha-7-koti-member-gift/

Related News