किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….

किरीट सोमय्या हेच एक भोंगा - हर्षवर्धन सपकाळ

आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर

भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.

यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,

Related News

सामाजिक तणाव आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले.

भोंग्यांबाबतच्या वादावर सपकाळ यांची प्रतिक्रिया:

किरीट सोमय्या पोलिसांना भोंगे बंद करण्याच्या सूचना देत आहेत,

पण देशात सर्वात मोठा भोंगा जर कोणी असेल, तर तो ते स्वतः आहेत.

लोकांची दिशाभूल करणे, तणाव निर्माण करणे आणि केवळ

टीका करण्याचा उद्योग करणं हेच त्यांचं मुख्य काम झालंय.” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राज्यातील सध्याच्या वातावरणावरून काँग्रेसची भूमिका:

हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे सांगितले की,

राज्यात राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरून वातावरण तापले आहे. अशा वेळी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष समाजामध्ये सलोखा आणि शांतता टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे.

त्यांनी प्रशासनाने सर्व धर्मांना समान न्याय देत भोंगे, सण-उत्सव आणि मिरवणुकींविषयी धोरण ठरवावे, असा सल्ला दिला.

Read Also : https://ajinkyabharat.com/tomorrows-weather-double-attack-continues/

Related News