अकोल्यात इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना;

अकोल्यात इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना;

अकोला (प्रतिनिधी): अकोल्याच्या अकोट फाईल परिसरातील पूरपीडित इंदिरानगरमध्ये

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात

आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Related News

या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या माजी नगरसेविका चांदणी रवी शिंदे आणि

आरोग्य सेवा सेलचे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तीव्र निषेध व्यक्त केला.

त्यांनी अकोट फाईल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका व्यक्तीला अटक

करण्यात आली असून संबंधित समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district-pavsacha-kahr-kanda-cum-picacha-damage/

Related News