नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पाकिस्तानसाठी जासूसी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात
आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा उर्फ ‘ज्योती राणी’ या प्रकरणात एक नवा खुलासा समोर आला आहे.
अटकेनंतर ज्या एफआयआरची चर्चा सुरू आहे, त्यात आरोपीचे नाव ‘ज्योती राणी’ असे नमूद करण्यात आले आहे,
Related News
‘सगळं हवेतच उडवलं जाईल’; ट्रम्प यांची घोषणा –
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशीही भीषण आग;
धक्कादायक! हडपसरमध्ये 22 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ;
अकोल्याच्या पोलीस अधीक्षकपदावर बदल:
अकोल्यात मुसळधार पावसाचा कहर :
कालपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू :
अकोल्यात घिरट्या घालणाऱ्या विमानाचा उलगडा;
अकोल्यात प्री-मान्सून पावसाचा जोर;
अकोल्यात इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना;
अकोला- जिल्ह्यात पावसाचा कहर, कांदा सह तीळ पिकांचे नुकसान
अकोल्यात विवाहसोहळ्यात ‘गौसेवे’चा अनोखा उपक्रम :
अकोट फैलमध्ये गटाराचे पाणी घरात;
ज्यामुळे तिच्या खरी ओळखीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ज्योतीवर पाकिस्तानच्या बाजूने व्ह्लॉग्स
तयार करणे, पाकिस्तानमध्ये दोनदा प्रवास करणे, आणि ISI संबंधित व्यक्तींशी संपर्क
साधल्याचा आरोप आहे. तसेच तीने पाकिस्तानमधील काही व्यक्तींना संवेदनशील माहिती
पुरवल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार, ज्योतीने ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाने यूट्यूब चॅनेल
सुरू केला होता. ती पासपोर्टधारक असून 2023 मध्ये पाकिस्तानच्या व्हिसासाठी दिल्लीतील
पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तेथेच तिची भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली. यानंतर त्या दोघांमध्ये संपर्क सुरू झाला.
ज्योतीने दोन वेळा पाकिस्तान दौरा केला, जिथे तीने अली अह्वान नावाच्या व्यक्तीच्या मदतीने वास्तव्य केले.
या सगळ्या प्रकारामध्ये ज्योतीवर भारतातील काही अहम ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे.
याशिवाय, तिचे पाकिस्तानच्या मरियम नवाज सोबतचे फोटोही समोर आले आहेत.
तीने चीनमध्येही दौरा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
ज्योती मल्होत्रा याविषयीचे तपास अजून सुरू असून तिची खरी ओळख ‘ज्योती राणी’
असल्याचे पुरावे एफआयआरमध्ये स्पष्ट झाले आहेत. तिच्या मेंदूवॉशिंगबाबतही
यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून यूट्यूब
आणि इतर प्लॅटफॉर्मवरील देशविरोधी कंटेंटबाबत सरकारकडून अधिक कडक धोरणांची मागणी होऊ लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolat-vivah-khivya-gaushevecha-unique-venture/