पातुरमध्ये गोवंश तस्करी उघडकीस :

पातुरमध्ये गोवंश तस्करी उघडकीस :

अकोला | पातुर : पातुर येथील बजरंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोवंश जातीच्या जनावरांची अवैध

तस्करी रोखत एक मोठी कारवाई केली आहे. हैदराबादला कत्तलीसाठी घेऊन जात

असलेला एक ट्रक त्यांनी मेळशी टोल नाक्याजवळ अडवून, त्यातील १२ गोवंश जनावरांची सुटका केली.

Related News

या प्रकरणाची गुप्त माहिती बजरंग सेनेला मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचला.

ट्रक अडवून त्यातील जनावरे सुरक्षित पद्धतीने खाली उतरवण्यात आली

आणि ट्रकसह आरोपींना पातुर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले.

पोलिसांनी याप्रकरणी तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

बजरंग सेनेचे पदाधिकारी गेल्या काही काळापासून अशा प्रकारच्या गोवंश तस्करी विरोधात सक्रिय

असून आतापर्यंत अनेक जनावरांचे प्राण वाचवले असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली.

संपर्क साधल्यावर पोलिसांनी सांगितले की, जनावरांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवले असून,

आरोपींविरोधात प्राण्यांवर क्रूरतेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-sahakarayabaddal-amhis-debtor-ahot/

Related News