मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
कृषी सहायकांचा एकदिवसीय काम बंद आंदोलन;
“अजित पवार हे प्रचंड मोठी चूक करत आहेत. ते जातीयवादी लोकांना पोसण्याचे काम करत आहेत.
याचे परिणाम त्यांना लवकरच भोगावे लागतील,” असा थेट इशारा जरंगे पाटलांनी दिला आहे.
“भुजबळांना चॉकलेट दिलंय!”
भुजबळांच्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया देताना जरांगेंनी टोला लगावला :
“छगन भुजबळ मंत्री झाला की नाही याचा आम्हाला काही फरक पडत नाही. ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे.
मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भुजबळांना तात्पुरता आनंद दिला गेला आहे.
त्यांना चॉकलेट दिलंय, पण या आनंदावर लवकरच विरजण पडेल.”
“तात्पुरतं नादी लावलंय”
जरांगे पुढे म्हणाले,
“हे सरकार, हे नेते तात्पुरते उपाय करून प्रश्न नादी लावत आहेत. पण आम्ही थांबणार नाही.
आमच्या प्रश्नांना फक्त मंत्रीमंडळ नाही, तर न्याय हवा आहे.“
भुजबळांच्या विरोधात वारंवार आक्रमक
छगन भुजबळ हे मराठा आरक्षणाला खुला विरोध करणारे असल्याने मनोज
जरंगे पाटील हे त्यांच्या नेहमीच विरोधात आक्रमक राहिले आहेत.
आज पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या निमित्ताने राजकीय तापमान वाढले असून,
मराठा आंदोलकांच्या भूमिका आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
जरंगे पाटलांच्या या प्रतिक्रियेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध
ओबीसी वादाचा सूर चढताना दिसतो आहे.
यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/state/