मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती

मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजेदरम्यान आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ही आग अभ्यागत प्रवेशद्वाराजवळील स्वागत कक्ष परिसरात लागली असून, घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.

Related News

 स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुद्द घटनास्थळी भेट देत माध्यमांशी संवाद साधला.

त्यांनी सांगितले की,

स्वागत कक्षातील स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली होती.

आगीचे स्वरूप खूपच किरकोळ होते आणि यावर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 परिस्थिती नियंत्रणात

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, विधानभवनातील दैनंदिन

कामकाजावर परिणाम झालेला नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 विधानभवनात सुरक्षा यंत्रणा सतर्क

या घटनेनंतर विधानभवनाच्या सुरक्षा यंत्रणेला सतर्क करण्यात आले असून, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे.

विधानभवन हे उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्थेने सज्ज असलेले ठिकाण असल्यामुळे अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/sambha-jama-mashidichya-survey-case/

Related News