अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील नवीन बायपास रोडवर आज सकाळी एक बिअरने भरलेली गाडी पलटी झाली.
अपघातानंतर गाडीतील बिअरच्या बाटल्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या आणि हे दृश्य पाहून अनेक बिअरप्रेमी घटनास्थळी जमले.
Related News
जरांगेंचा 500 कोटींचा दावा, नरेश म्हस्के मैदानात! म्हणाले, ‘फॉरेन्सिक तपास करा’
मनोज जरांगेंनंतर रामदास कदमांचाही पलटवार! ‘तुमच्या गुप्त बैठकीची क्लिप माझ्याकडे’
इराणच्या सीमेजवळ इस्रायलची युद्धाची तयारी? फायटर जेट्सच्या हालचालींनी खळबळ!
पतीच्या निधनानंतर दोन महिन्यांनी Aruna Irani यांचा भावूक व्हिडीओ; चाहत्यांना म्हणाल्या…
भारतावरील टॅरिफ संकट टळणार? मार्को रुबिओ यांचा मोठा खुलासा!
ज्या ब्रिटनने भारताला गुलाम बनवले, त्याच देशात Dhruv Rathee चे आंदोलन! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
भारताच्या सीमेजवळ चीनची मोठी खेळी! बांगलादेशचा 335 दशलक्ष डॉलरचा करार
राहुल गांधी यांनी गर्भवती महिला पत्रकाराला धक्का दिला? भाजपचा गंभीर आरोप
ध्रुव राठी महिन्याला 60 लाख कमावतो? 58 कोटींच्या संपत्तीच्या दाव्यामागचं सत्य!
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून राहुल गांधी आक्रमक; मोदी सरकारला म्हणाले, “आम्हाला हेच हवंय!”
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार? नायरा नंतर सरकारी कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष
दांडुके चालवा, बंदुका रोखा; आम्ही जाणारच! संजय राऊतांचा सरकारला इशारा
काहींनी तर गाडीतील बिअर लंपास करण्याचा मोह टाळला नाही.
अपघातात सुदैवाने जीवितहानी नाही
गाडीचा चालक सुरक्षित असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. बिअरने भरलेली ही गाडी शहरात
वितरणासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उलटली.
बिअरप्रेमींचा ‘उत्साह’
अपघातानंतर काही मिनिटांतच स्थानिक नागरिक आणि बिअरप्रेमी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले.
काहींनी रस्त्यावर पडलेल्या बिअरच्या बाटल्या उचलत पळ काढला. या प्रकारामुळे वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
याप्रकरणी बिअर चोरी करणाऱ्यांविरोधात कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांच्या आधारे कारवाई होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
प्रशासनाची प्रतिक्रिया
प्रशासनाने नागरिकांना अशा घटनांमध्ये कायदेशीर गुन्हा होऊ शकतो, याची जाणीव ठेवून वस्तू चोरणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल झाली असून, “बिअर गेली, कायदे हरले” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/mobilechaya-borrowing-dismantling-mahanhanicha-phan-yuvikachi-suicide/

