“मंत्री असून अशी भाषा?

"मंत्री असून अशी भाषा?

मध्यप्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरैशी यांच्यावर

दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर महूच्या मानपुर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

एफआयआर रद्द करण्यासाठी विजय शाह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली,

Related News

मात्र सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांना जोरदार फटकारले.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत म्हटलं, “संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने वागायला हवं.

देश सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, त्यात नेत्यांनी अधिक संयमाने बोलायला हवं.”

शाह यांनी कोर्टात आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून, त्यांची याचिका शुक्रवार रोजी ऐकली जाणार आहे.

दरम्यान, काँग्रेसने विजय शाह यांच्यावर राजीनाम्याची मागणी करत राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत.

इंदौर, भोपाळ आणि जबलपूरमध्येही जोरदार निषेध आंदोलन होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-vadi-vyasah-pavsachi-loud-hajeri/

Related News