मुंबई | प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात देशभक्तीची लाट उसळली असतानाच मुंबईतील एका जोडप्याने शहीद
मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. स्वतःच्या परदेश दौऱ्यासाठी साठवलेली
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
रक्कम त्यांनी शहीदाच्या कुटुंबाला अर्पण केली आहे. ही घटना समाजाला एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.
शहीदासाठी दांपत्याचा अभिमानास्पद निर्णय
जोडप्याने आपली ओळख गोपनीय ठेवत ही मदत ‘वीआरयुवा’ संस्थेच्या माध्यमातून केली आहे.
त्यांचा विश्वास आहे की देशासाठी बलिदान दिलेल्या एका सुपुत्राच्या कुटुंबाला ही मदत थोडासा आधार देईल.
“आमच्या परदेश दौऱ्यापेक्षा एका वीरमृत जवानाच्या कुटुंबाचं सुख महत्त्वाचं आहे,” असं त्या दांपत्याचं म्हणणं आहे.
शहीद मुरली नायक – एकमेव अपत्य, देशासाठी बलिदान
शहीद मुरली नायक हे आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्लीथांडा गावचे रहिवासी होते.
ते आपल्या आई-वडिलांचे एकमेव अपत्य होते. एलओसीवर झालेल्या गोळीबारात त्यांनी वीरमरण पत्करलं.
त्यांच्या बलिदानाने संपूर्ण देशात शोकाची लाट उसळली.
सरकारकडूनही मदतीचं आश्वासन
आंध्र प्रदेश सरकारने शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
त्याचसोबत ५ एकर शेती, ३०० वर्ग गजांचे घर आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे
आश्वासनही देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही २५ लाख रुपयांची वैयक्तिक मदत जाहीर करत कुटुंबाला भेट दिली.
समाजासाठी प्रेरणा
या दांपत्याने दाखवलेली संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात
कौतुकाचा विषय ठरली आहे. देशासाठी प्राण गमावणाऱ्या जवानांच्या
कुटुंबासाठी सामान्य नागरिकांचाही हातभार लागू शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/cj/