नवी दिल्ली | १३ मे २०२५
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने दहशतवाद्यांवर कडक कारवाई केली आणि
40 हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा, तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले.
पाकिस्तानने ही माहिती लपवण्याचा कितीही प्रयत्न केला असला, तरी सत्य आता जगासमोर आले आहे.
रावळपिंडी आणि लाहोरच्या रुग्णालयांत घायाळ पाकिस्तानी जवानांनी खचाखच भरलेले चित्र समोर आले असून,
पाक लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर स्वतः रावळपिंडीच्या रुग्णालयात जाऊन जवानांची भेट घेतली आहे.
त्याचप्रमाणे पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी लाहोरमध्ये रुग्णालयात जाऊन भेट दिली.
“प्रत्येक बेडवर घायाळ जवान”
रावळपिंडी आणि लाहोरच्या प्रमुख लष्करी रुग्णालयांमध्ये एकही बेड मोकळा नाही.
प्रत्येक खाटेवर पाकिस्तानचा एक घायाळ जवान भरती आहे. या दृश्यांनी पाकिस्तानला बसलेल्या फटक्याचे गांभीर्य स्पष्ट होते.
“पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड”
सामोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये रुग्णालयांत गर्दी, वैद्यकीय तातडी,
आणि सैनिकांचे हाल पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत
मौन बाळगले असले तरी, या प्रत्यक्ष घटनांनी त्याचा खोटारडेपणा उघड केला आहे.
“शांततेचं नाटक, पण भीती पोटात”
ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्याने पाकिस्तानने आता सीझफायरची मागणी केली आहे.
भारताच्या ठोस कारवाईनंतर पाकिस्तानची फौज बिथरली असून, किती सैनिक मारले गेले
आणि किती जखमी झाले, याची आकडेवारी पाकिस्तान अजूनही दडवत आहे.
पण त्यांच्या स्वतःच्याच कृतींमधून सत्य समोर येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/removed/