चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू

चंद्रपूर | १२ मे २०२५ :

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मूल तालुक्यातील भादूरणा गावात तेंदूपत्ता तोडणाऱ्या २८ वर्षीय भूमिका भेंदारे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

Related News

त्या आपल्या पतीसोबत जंगलात तेंदूपत्ता गोळा करत होत्या, यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला.

या घटनेपूर्वी, १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा-माल येथे ३ महिलांचा आणि ११ मे

रोजी महादवाडी येथे आणखी एका महिलेचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला होता.

त्यामुळे गेल्या ७२ तासांत एकूण ५ महिलांचा बळी गेला आहे.

काँग्रेस गटनेते आणि स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार यांनी मृतकांच्या अंत्यसंस्काराला

उपस्थित राहून कुटुंबियांचे सांत्वन केले आणि वनविभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, काही तासांतच पुन्हा एक बळी गेल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होत आहेत.

Read Also :
https://ajinkyabharat.com/pahalgamparpat-papacha-papacha-would-have-been-filled/

Related News