अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;

अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;

अकोला :

अकोला शहरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

अवघ्या वीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

Related News

शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून काही भागांमध्ये झाडे उन्मळून पडल्याची माहिती मिळत आहे.

सध्या अकोला जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

मात्र, आजच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून

तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे.

काही भागांमध्ये फळबागा व उभ्या पिकांवर पावसाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/india-pakistan-is-in-the-middle-of-the-weapon/

Related News