अकोला, दि. १० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग
राहून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच,
चुकीची माहिती, अफवा पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसे आढळल्यास वेळीच खंडन करावे,
Related News
अकोला
एम आय एम शाखेच्यावतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि
शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट सुरू करा अशी शिष्टमंडळाने आयुक्तांना मागणी केली होत...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बोरगाव मंजू (ता. अकोला) येथे सोमवारी रात्री उशिरा शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करत वादाला उधाण आले.
क...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे दरोडा टाकणाऱ्या टोळीचा उरळ पोलिसांनी पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे.
फिर्यादीला अडवून चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन चांदीच...
Continue reading
अकोला - सिने सृष्टीत मानाचे असलेल्या चित्रनगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी अकोल्याचे दिग्दर्शक निलेश
जळमकर यांची त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल अखिल भा...
Continue reading
अकोला प्रतिनिधी |
अकोला जिल्ह्यात आजपासून 4 जुलैपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये जिल्ह्यात जून महिन्यात 155 मिमी पावसाची नोंद झाली असून तो...
Continue reading
अकोला प्रतिनिधी | २ जुलै २०२५
हिंदी सक्तीबाबत मनसे व शिवसेनेच्या भूमिकांवरून राज्यातील राजकारण तापले असताना,
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माजी...
Continue reading
मुर्तीजापूर (अकोला) –
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील बाबुळगाव जहागीर, एमआयडीसी अकोला परिसरात २९ जून रोजी दुपारी स्पेन गार्डन समोर भीषण अपघात घडला.
गुजरातहून नागपूरकडे माती घ...
Continue reading
नवी दिल्ली | 1 जुलैपासून लागू
एलपीजी वापरकर्त्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी
सिलेंडरच्या किमतीत तब्बल ₹५८.५० ची कपात केली आहे. ही...
Continue reading
प्रतिनिधी । भोपाल
हत्या करण्याच्या प्रयत्नात दोषी ठरलेल्या आरोपीने १० वर्षांची शिक्षा ऐकताच कोर्टातून पलायन केल्याची घटना
भोपालमधील न्यायालयात घडली. आरोपी आसिफ खान उर्फ टिंगू या...
Continue reading
अकोला प्रतिनिधी
अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरट्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे.
अब्दुल रब अब्दुल नासीर आणि मोहसीन खान जक...
Continue reading
बाळापूर (अकोला) प्रतिनिधी
बाळापूर शहरातील मन नदीच्या पात्रात आज सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून
आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटन...
Continue reading
विशाल आग्रे । अकोट प्रतिनिधी
अकोट – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने अकोट
तहसील कार्यालयात बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) ...
Continue reading
असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.
सदयस्थितीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेले निर्देश आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
घेण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
सहाय्यक पोलीस अधीक्षक अमल मित्तल, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी
तथा उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, सर्व उपविभागीय अधिकारी , सर्व तहसीलदार ,
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम , जिल्हा शल्य चिकीत्सक , जिल्हा आरोग्य अधिकारी ,
सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार म्हणाले की, सर्व यंत्रणांनी परस्परांशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वायरलेस यंत्रणा, २४ बाय ७ नियंत्रण कक्ष व सर्व सुरक्षा यंत्रणा ’अलर्ट’ ठेवाव्यात.
चुकीची माहिती मिळून कुठेही अव्यवस्था निर्माण होता कामा नये. अफवा पसरू नयेत याची खबरदारी घ्यावी.
अधिकृत संदेश व संकेतस्थळाबाबत नागरिकांची जाणीवजागृती करावी.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व नालेसफाई आदी कामे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहित मुदतीत पूर्ण करावी.
रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, निवारा केंद्रे, आरोग्य केंद्रे सुसज्ज ठेवावी. पुरेसा औषध साठा ठेवावा.
सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. दूषित पाणी, अस्वच्छता, रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना कराव्यात.
हवामान खात्याकडून येणा-या सूचना सर्वदूर प्रसारित व्हाव्यात. जलप्रकल्पांच्या ठिकाणी आवश्यक सर्व दुरुस्ती वेळेत पूर्ण कराव्यात.
आरोग्य विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी
यंत्रणांनी नियंत्रण कक्ष सुरू करून जिल्हा नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवावा.
नदी नाल्याच्या प्रवाहास अडथळा असलेले अतिक्रमण काढणे, घनकचरा व्यवस्थापन, संभाव्य धोका टाळण्यासाठी
वाळलेली झाडे विहित प्रक्रिया पूर्ण करून तोडणे आदी बाबींची वेळेत पूर्तता करावी,
असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांनी दिले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/mission-sinduramadhye-300-jawan-sarahdhadi/