मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर

मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर

सतना (मध्य प्रदेश) :

जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.

Related News

फक्त 4700 लोकसंख्या असलेल्या या गावातील 500 हून अधिक लोक सैन्यात आहेत,

तर 300 जवान सध्या प्रत्यक्ष सीमेवर मिशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या नापाक कारवायांना प्रत्युत्तर देत आहेत.

या गावाच्या प्रत्येक घराचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भारतीय लष्कराशी संबंध आहे. कोण नेव्हीत आहे,

कोण एअरफोर्समध्ये, तर कोण स्पेशल कमांडो युनिटमध्ये कार्यरत आहे. इथल्या मातांचे स्वप्न मुलांना वर्दीत

पाहण्याचं असतं आणि मुलंही “भारत माता की जय” च्या घोषणांमध्ये देशभक्तीने मोठी होतात.

सात पिढ्यांची शौर्यपरंपरा

चूंद गावाच्या मातीला वीरांचा सुगंध लाभला आहे. दुसऱ्या महायुद्धापासून कारगिल युद्ध आणि आता मिशन सिंदूरपर्यंत,

या गावाने सात पिढ्यांतून सैन्यात सेवा दिली आहे. गावात शहीद समर बहादुर सिंह, शहीद कन्हैया लाल सिंह

आणि शहीद बाबूलाल सिंह यांचे स्मारक आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देतात.

मिशन सिंदूर सुरु होताच जवान पुन्हा मोर्चावर

अलीकडेच काही जवान सुट्टीवर गावात आले होते. पण मिशन सिंदूर सुरु झाल्याचे आदेश मिळताच,

त्यांनी एकही क्षण न गमावता सरळ मोर्चाकडे प्रस्थान केलं. गावातील महिलाही आपल्या पती,

भाऊ आणि मुलांच्या शौर्यावर अभिमान बाळगतात. त्यांच्या डोळ्यात चिंता असली तरी हृदयात देशासाठीची निष्ठा कायम असते.

निवृत्त जवानांचा देखील जोश कायम

गावातील निवृत्त जवान देखील आजही म्हणतात, “जर सरकारने पुकारा दिला,

तर आम्ही पुन्हा बंदूक उचलायला तयार आहोत.” ही देशभक्तीच चूंद गावाला ‘वीर सपूतांची भूमी’ बनवते.

Read Also : https://ajinkyabharat.com/india-pakistan-ceasefire-agreed-trump-yancha-motha-claim/

Related News