राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना “सत्यशोधक” पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना “सत्यशोधक” पुरस्काराने सन्मानित

पातूर (जि. अकोला) – महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचा जागर करणारे राष्ट्रीय प्रबोधनकार

सत्यपाल महाराज यांना नुकताच “सत्यशोधक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र माळी युवक संघटना आणि किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने

Related News

पातूर येथील श्री सिदाजी महाराज मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित एका

भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या विशेष सोहळ्याला विधान परिषद सदस्य आ. संजय खोडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी आ. साजिद खान पठाण यांचाही नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी भूषवले.

सत्यपाल महाराज यांचा सन्मान आ. संजय खोडके, आ. साजिद पठाण आणि प्रकाश तायडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांमध्ये—

  • समता परिषदेचे नेते गजानन बारतासे

  • किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे अध्यक्ष गोपाल गाडगे

  • माजी सभापती बालुभाऊ बगाडे, भाजपाचे शहराध्यक्ष गणेश गाडगे, नगरसेवक राजू उगले

  • सिदाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष महादेवराव गणेशे, प्रा. विलास राऊत

  • गुरुदेव सेवाश्रमचे विश्वस्त संजय पाटील, सय्यद कमरुद्दीन

  • शिवसेनेचे सागर कढोणे, वंचितचे निर्भय पोहरे, सागर रामेकर

  • काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई, प्रशांत डवरे, अविनाश मार्डीकर, दिलीप कडू, अशोक हजारे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संचालन आणि आकर्षण

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल गाडगे यांनी केले. सुत्रसंचालन चंद्रकांत बारतासे तर आभार प्रदर्शन शैलेश बोचरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर राष्ट्रीय कीर्तनाने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.

यशस्वी आयोजनामध्ये सहकार्य

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन ढोणे, डीगांबर फुलारी, सुनील पाटील, महेश बोचरे, निखिल बारतासे,

महेश सौंदळे, संतोष उगले, पंकज वालोकर, योगेश शिरसागर, सुमित बारतसे, अक्षय श्रीनाथ,

रोशन वानखडे, गौरव माकोडे, शंकर पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सत्यपाल महाराज यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी केलेल्या कार्याची पावती असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

Read Also : https://ajinkyabharat.com/indo-pak-sangharsh-parshvarvivar-social-media-vavanavan-peve/

Related News