नवी दिल्ली, ८ मे – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे
पाकिस्तानात ठाण मांडलेल्या नऊ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली. या घडामोडीनंतर
भारत-पाकिस्तानमधील तणाव टोकाला गेला असून देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Related News
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
कल्याण : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे अनेक बेकायदा व्यवसायांवर गदा आली आहे. गुटखाविरोधातील कठोर ...
Continue reading
Qatar LNG Plant Explosion : कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरातील बरजान परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या दुर्दैवी घटनेत 13 जण...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट आयोजित केला.
यामध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याच्या धोका निर्माण झाल्यास स्वत:चा जीव कसा वाचवायचा,
याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवण्यात आला,
ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि काळजी निर्माण झाली – नेमका हा सायरन कधी वाजतो? आणि जीव वाचवण्यासाठी किती वेळ मिळतो?
सायरन कधी वाजतो?
जेव्हा शत्रू राष्ट्राकडून रॉकेट, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करतात, तेव्हा हवाई
दलाचे रडार तत्काळ ते ओळखतात. त्या आधारे संभाव्य हल्ल्याच्या ठिकाणी ६० सेकंदांचा एअर रेड सायरन वाजवला जातो.
या सायरनचा अर्थ – नागरिकांनी त्वरीत सुरक्षित स्थळी जायला हवं.
जीव वाचवण्यासाठी मिळतो किती वेळ?
हल्ल्याची शक्यता असलेल्या भागात हा सायरन वाजवण्यात येतो, ज्यामुळे लोकांना फक्त सुमारे एक मिनिट
मिळतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. हा सायरन वाजल्यावर तातडीने जवळच्या बंकरमध्ये किंवा सुरक्षित इमारतीच्या खालील मजल्यावर जाण्याचा सल्ला दिला जातो.
सायरन मागचं तंत्रज्ञान काय?
रडार प्रणाली शत्रूच्या हालचाली ओळखते आणि त्या आधारे तात्काळ रेड अलर्ट जारी केला जातो.
त्यानंतर स्थानिक यंत्रणांमार्फत सायरन सक्रिय केला जातो. ही प्रणाली मुख्यतः लष्करी तळ, विमानतळ तसेच संवेदनशील नागरी भागांमध्ये कार्यरत असते.
भारतीय नागरिकांना अशा संकट काळात सजग राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/district-chief-srirang-pinjarkar-yancha-call/