भारताचा निर्णायक प्रतिहल्ला; इस्लामाबाद, लाहोर, कराचीवर क्षेपणास्त्रांचा मारा
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरापतींना आता भारताने कडक प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. लाहोरवर यशस्वी हल्ल्यानंतर आता थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर क्षेपणास्त्रांद्वारे निशाणा साधण्यात आला आहे.
भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये सायरनचा आवाज घुमू लागला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
पाकिस्तानकडून नागरी भागांवर हल्ला, भारताचं तातडीनं प्रत्युत्तर
पाकिस्तानने भारताच्या नागरी भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने तो हल्ला अयशस्वी ठरवला. त्यानंतर भारताने लाहोरवर हल्ला करून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं. त्यानंतर कराची, सियालकोट आणि आता इस्लामाबादवरही निशाणा साधण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये अंधाराचे साम्राज्य
भारतीय हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. इस्लामाबाद, लाहोर, कराचीसह पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर्णपणे अंधार पसरला आहे. या ब्लॅकआऊटनं पाकिस्तानची प्रसारण व्यवस्था, संचार आणि प्रशासन यावर मोठा परिणाम झाल्याचं सूत्रांकडू समस्त आहे.