रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला

रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला,

इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभूमीवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ भारतीय ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून,

Related News

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने PSL (पाकिस्तान सुपर लीग)

स्पर्धेच्या भवितव्याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.

या हल्ल्याच्या घटनेमुळे ८ मे रोजी रावळपिंडीमध्ये होणारा पेशावर विरुद्ध कराची

यांच्यातील सामना धोक्यात आला आहे. PCBच्या बैठकीस PSLमधील सर्व

टीम मालक उपस्थित राहणार असून, स्पर्धा रद्द करायची की पुढे सुरू ठेवायची, याबाबत चर्चा होणार आहे.

सध्या कोणत्याही विदेशी खेळाडूने PSLमधून माघार घेतलेली नाही,

मात्र सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे. PSLच्या १० व्या हंगामाचा सुपर

फायनल १९ मे रोजी नियोजित आहे, पण या घटनेनंतर संपूर्ण स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/viz-nahi-ashi-takrar-mahagat/

Related News