2020 हे वर्ष उर्वशी संघवीसाठी दुःखद ठरले. वडिलांच्या निधनामुळे तिच्या आयुष्यातील आधारवड हरपला.
मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द न सोडता, उर्वशीने आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर तिचा प्रवास सुरू ठेवला.
दहावीच्या परीक्षेत 93.20% गुण मिळवून तिने पहिलाच ठसा उमटवला.
Related News
राजस्थानच्या लाठीमधून पाकिस्तानी वैमानिक जिवंत पकडला, JF-17 लढाऊ विमानात होता सवार
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बिथरलेली कुरापत:
तिच्या मेहनतीला आणि इच्छाशक्तीला ओळखून मूर्तिजापूर येथील समाजसेवक रविकुमार राठी यांनी पुढाकार घेत तिचे पालकत्व स्वीकारले.
त्यांनी शैक्षणिक मदतीसह तिला आत्मनिर्भर होण्यासाठी बळ दिले.
काल जाहीर झालेल्या 12 वी च्या निकालात उर्वशीने पुन्हा एकदा तिच्या क्षमतेचा ठसा उमटवला.
अकोल्यातील S.A. कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेत 93.83% गुण मिळवत कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक मिळवला.
मुलींमध्ये ती प्रथम आली. तसेच ‘मायबोली कोचिंग क्लास’ आणि ‘नीरज राठी करिअर फोरम’ यांची मेरिट यादीही तिच्या नावाने उजळली.
“माझ्याकडे बारावीची पुस्तकं, गाईड किंवा रेफरन्स बुक्स नव्हतीत. मात्र नीरज राठी करिअर फोरमच्या नियमित लेक्चर्स,
टेस्ट सिरीज आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले,” असे उर्वशीने नम्रपणे सांगितले.
थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि स्वतःची मेहनत हाच तिच्या यशाचा मूलमंत्र ठरला.
संकटांना न डगमगता, असह्य परिस्थितीला तोंड देत, उर्वशीने केवळ शिक्षणाची मशाल हाती घेतली नाही,
तर ती यशाच्या शिखरावर नेली. सध्या ती सीए (चार्टर्ड अकाउंटंट) अभ्यासक्रम करत आहे
आणि तिच्या यशस्वी वाटचालीसाठी संपूर्ण समाजाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
उर्वशी संघवीचे यश म्हणजे जिद्द, संघर्ष आणि अढळ इच्छाशक्ती यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindurcha-results-stuck/