नवी दिल्ली | प्रतिनिधी
२२ एप्रिल रोजी पल्लनगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी
तळांवर निर्णायक हवाई कारवाई केली. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं असून,
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हे नाव निश्चित केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
‘सिंदूर’ हे नाव फक्त वैवाहिक स्त्रियांच्या मांगातील सौभाग्याचं प्रतीक नाही,
तर त्या स्त्रिया ज्या या हल्ल्यामुळे विधवा झाल्या – त्यांचा सन्मान, आणि त्यांच्या अश्रूंना दिलेला न्याय
असाही संदेश हे नाव देते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले,
ज्यात जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे मुख्य अड्डे होते.
या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. लेफ्टनंट विनय नारवाल यांच्या नवविवाहित पत्नी
हिमांशी आणि पर्यटक पल्लवी रावच्या व्हायरल झालेल्या दृश्यांनी देशाच्या भावना हलवल्या.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे त्या आणि इतर विधवा महिलांना काही प्रमाणात न्याय मिळाला आहे, असं अनेक पीडित कुटुंबांनी म्हटलं आहे.
भारतीय लष्कराने जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये ‘Operation Sindoor’ हे नाव ठळक अक्षरात असून,
त्यातील ‘O’ सिंदूराच्या वाटीसारखं दाखवण्यात आलं आहे. खाली मजकूर आहे – “Justice is served. जय हिंद.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पल्लनगाम हल्ला म्हणजे भारताच्या आत्म्यावर झालेला आघात आहे.
देश शत्रूंच्या कोणत्याही कारवायेला गप्प बसणार नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शिक्षा होणारच.”
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-ankhi-kharchi-persity/