पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) आणि बहावलपूरपर्यंत
पसरलेल्या दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे.
Related News
राजस्थानच्या लाठीमधून पाकिस्तानी वैमानिक जिवंत पकडला, JF-17 लढाऊ विमानात होता सवार
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
भारतीय सैन्याने मध्यरात्री १.३० च्या सुमारास ही कारवाई केली असून, यामध्ये नऊ ठिकाणी लक्ष्य भेदण्यात आले आहेत.
या हल्ल्यांदरम्यान भारताने पाक सैन्याच्या कोणत्याही अधिकृत स्थळांना लक्ष्य न करता थेट
दहशतवाद्यांच्या तळांवरच स्ट्राइक केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही रणनीती भारताच्या धोरणात्मक परिपक्वतेचं
आणि जबाबदारपणाचं उदाहरण मानली जात आहे. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत,
ज्यात पाकिस्तानी नागरिक आश्चर्य आणि भीतीने प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही व्हिडीओत गाडी चालवत असलेले
नागरिक अचानक क्षेपणास्त्र कोसळल्याचं दृश्य टिपताना ऐकू येतात, “काय झालं… व्हिडीओ बनवा…”
भारतीय हवाई दलानेही यावेळी गस्त वाढवून सीमेवर सतर्कता अधिक तीव्र केली आहे. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवरील
सुरक्षा बैठका सुरू असून याच काळात देशभरात ३०० ठिकाणी मॉक ड्रिलदेखील राबवली जात आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे सीमावर्ती भागात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात आली
असून कारवाईचा उद्देश फक्त दहशतवाद्यांचा नायनाट हा असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/railway-pravashansathi-mahatwachi-baatmi/