वडिलांच्या दोन्ही किडन्या निकामी;

वडिलांच्या दोन्ही किडन्या निकामी;

पंजाब किंग्ज संघाच्या २४ वर्षीय फलंदाज प्रभसिमरन सिंहने आयपीएल २०२५ मध्ये आपली खेळी

आणि जिद्द यांच्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं आहे. रविवारी पंजाब आणि लखनऊ

यांच्यात झालेल्या सामन्यात प्रभसिमरनने ४८ चेंडूत ९१ धावांची तुफान खेळी करत पंजाबला ३७ धावांनी विजय मिळवून दिला.

Related News

या खेळीत त्याने ६ चौकार आणि ७ षटकार ठोकले.

तथापि, मैदानावर चमकणाऱ्या प्रभसिमरनच्या आयुष्यात मोठा वैयक्तिक संघर्ष सुरू आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, प्रभसिमरनचे वडील सूरजीत सिंह यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या

असून त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावे लागते. या कठीण परिस्थितीतही प्रभसिमरन

मैदानात खेळत असून आपल्या वडिलांसाठी प्रेरणादायी कामगिरी करत आहे.

प्रभसिमरनने आपल्या फलंदाजीतून केवळ संघाचं नाही, तर वडिलांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे क्षण आणले आहेत.

वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून मैदानावर तुफान खेळी करणाऱ्या या तरुण खेळाडूचा लढा सर्वांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/supreme-cortacha-motha-decision/

Related News