मासिक पाळीत स्वयंपाक केल्याने सुनेचा खून?

मासिक पाळीत स्वयंपाक केल्याने सुनेचा खून?

जळगाव |

२६ वर्षीय गायत्री कोळीच्या मृत्यूनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केल्याच्या कारणावरून सासरच्यांनी मारहाण केली

Related News

आणि अखेर तिचा जीव घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानं प्रकरण खळबळजनक वळणावर पोहोचलं आहे.

जळगाव तालुक्यातील किनोद गावात १ मे रोजी गायत्री ज्ञानेश्वर कोळी या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

मात्र ही आत्महत्या नसून सासू आणि नणंद यांनी मारहाण करून खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

गायत्रीचा मृतदेह पाहून तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

गायत्रीचे वडील आणि आई यांनी स्पष्टपणे सांगितले की, “गायत्री आत्महत्या करूच शकत नाही, तिची सासू आणि नणंद यांनीच गळा दाबून खून केला आहे.”

मासिक पाळीवरून वाद, आणि मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मासिक पाळीमध्येही गायत्रीने स्वयंपाक केल्याने सासू आणि नणंद नाराज होत्या.

त्यावरून वाद झाला, आणि तो इतका विकोपाला गेला की, दोघींनी तिच्यावर बेदम मारहाण केली.

त्यानंतर गळा दाबून खून करून, आत्महत्येचा बनाव तयार करण्यात आला, असा दावा तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

पोलीस तपास सुरु, आरोपी अजूनही मोकाट

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस तपास करत आहेत. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गायत्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी सांगितले की, “जबपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.”

राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

या प्रकारामुळे समाजात मासिक पाळीबद्दलच्या रूढी आणि अंधश्रद्धांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनेक महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात जलद कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/2-thousand-rupee-notambabbat-rbi-chi-mothi-declaration/

Related News