मुंबई :
दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या
नोटा अजूनही वैध चलन म्हणून ग्राह्य धरल्या जात आहेत, अशी मोठी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिली आहे.
Related News
चारधाम यात्रा करणार सोपी
तामिळनाडूतील मच्छिमारांवर श्रीलंकन लुटारूंचा हल्ला
पाकिस्तान ध्वजावाहक जहाजांना भारतात प्रवेशबंदी
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या पित्याचे राक्षसी रूप
श्री लैराई देवीच्या यात्रेत भीषण चेंगराचेंगरी
अंतराळात आनंदाचा क्षण!
अकोला: जुना शहर पोळा चौकात युवकावर जीवघेणा हल्ला
अकोला: नवीन उड्डाणपुलावर दुचाकी अपघात
झांसी: डीजे वाजवल्याच्या वादातून गोंधळ
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्समधून ‘या’ 5 खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता?;
“भारत युद्ध करेल” भीतीने थरथरलेला पाकिस्तान!
आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार अजूनही ६,२६६ कोटी रुपयांच्या २ हजारांच्या नोटा चलनात आहेत.
१९ मे २०२३ ला घेण्यात आला होता निर्णय
रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी दोन हजारांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी चलनात ३.५६ लाख कोटी रुपयांच्या २ हजारांच्या नोटा होत्या.
आता या पैकी ९८.२४ टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत.
मात्र अद्यापही उर्वरित नोटा वापरात असल्याची माहिती RBI ने दिली आहे.
नोटा अजूनही वैध – बदलण्याची सोय सुरुच
२ हजार रुपयांच्या नोटा ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमधून बदलता येत होत्या.
सध्या या नोटा RBI च्या १९ निर्गम कार्यालयांमध्ये स्वीकारल्या जात आहेत.
तसेच, नागरिक आणि संस्था या नोटा आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी देखील या कार्यालयांमध्ये देऊ शकतात.
पोस्टानेही पाठवता येणार नोटा
RBI ने आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे –
आता नागरिक भारतीय डाक (पोस्ट ऑफिस) मार्फत २ हजारांच्या नोटा RBI च्या कोणत्याही निर्गम कार्यालयात पाठवू शकतात.
त्या नोटा खातेदाराच्या बँक खात्यात जमा केल्या जातात.
लेनदेनात अडचणींचा अनुभव
या नोटा बाजारातून काढण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्यवहार
करताना या नोटांसाठी सुट्टे पैसे उपलब्ध नसणे आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी.
त्यामुळेच RBI ने या उच्च मूल्याच्या नोटा चलनातून हळूहळू मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
Read Also : https://ajinkyabharat.com/he-is-a-worry/