एसटी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न

एसटी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.

मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक एसटी बसमध्ये अग्निशमन यंत्र उपलब्ध नाही,

Related News

तर काही बसमध्ये असलेली यंत्रे फक्त शोभेची वस्तू बनून राहिली आहेत.

सुरक्षा वाऱ्यावर?

एसटी बसमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन यंत्र असणे अनिवार्य आहे.

पण प्रत्यक्षात काही बसगाड्यांमध्ये अग्निशमन यंत्र गायब आहेत, तर काही ठिकाणी ती निकामी किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवलेली आहेत.

त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

“अग्निशमन यंत्र बसमध्ये असलं तरी त्याची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी फक्त कागदापुरती पूर्तता केली जाते,”

— एसटी महामंडळातील एका चालकाची प्रतिक्रिया.

सरकारी नियमांची पायमल्ली

सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये अग्निशमन यंत्र असणे बंधनकारक केले आहे.

मात्र, एसटी महामंडळ याबाबत उपेक्षा करत असल्याचं चित्र दिसून येतं आहे.

काही बसस्थानकांवरील जुने बस पाहिल्यास कोणतीही आग प्रतिबंधक यंत्रणा नाही हे प्रकर्षाने जाणवतं.

मध्य प्रदेशच्या बसमध्ये आधुनिक यंत्रणा

दुसरीकडे, शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून येणाऱ्या बसमध्ये अत्याधुनिक अग्निशमन तंत्रज्ञान बसवलेलं पाहायला मिळतं.

अशा यंत्रणेमुळे अपघात किंवा आगीच्या प्रसंगी त्वरित प्रतिसाद देणे शक्य होते.

“आमच्या बसमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा आहेत, आणि त्या वेळोवेळी तपासल्या जातात,”

— सैय्यद इरफान, बस चालक, मध्य प्रदेश

उन्हाळ्यात अधिक धोका

सध्या उन्हाळ्याचे तीव्र दिवस सुरू आहेत. या काळात वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत.

त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही बाब अधिक गंभीर बनते. संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व बसगाड्यांमध्ये कार्यक्षम अग्निशमन यंत्र असावीत याची खात्री करावी,

अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. अन्यथा एक छोटीशी दुर्लक्षदेखील मोठ्या अपघाताचं कारण ठरू शकतं.

Read Also : https://ajinkyabharat.com/nashikamadhyay-accused-krishchi-thararak-escape/

Related News