पीडित कुटुंबांना ५० लाखांचं अर्थसहाय्य

पीडित कुटुंबांना ५० लाखांचं अर्थसहाय्य – मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील

नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Related News

हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली, कुटुंबांना आधार

बैठकीदरम्यान पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील.

केवळ आर्थिक मदतीपुरतंच नव्हे तर त्यांच्या शिक्षण, रोजगाराच्या बाबतीतही शासन मदत करणार आहे.

संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरी

या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. राज्य सरकारने त्यांच्या मुलीला –

असावरी जगदाळे हिला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत होणार आहे.

राज्य सरकारचा ठाम निर्णय – ‘कुटुंब एकटं नाही’

राज्य सरकारने यावेळी स्पष्ट केलं की, हल्ल्यातील बळींच्या कुटुंबांना सर्व प्रकारची शासकीय मदत पुरवली जाईल.

या निर्णयाने पीडित कुटुंबीयांना मानसिक आणि सामाजिक आधार मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील नागरिकांना गमवण्याची दु:खद घटना असली,

तरी राज्य सरकारने घेतलेला संवेदनशील निर्णय ही त्या कुटुंबांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/18-years-ipl-14-varshachaya-poracha-tararak-karnama/

Related News