किसान हार्डवेअर दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

किसान हार्डवेअर दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

अकोला : शहरातील मोहम्मद अली रोडवरील किसान हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

आगीमुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट :

Related News

ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

मात्र आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.

अग्निशमन विभागाची तातडीची कारवाई :

आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळवला.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण :

या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/jalaun-momozvarun-suit-mulinchi-rastatch-tumbala/

Related News