इस्लामाबाद / क्वेटा:
पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे.
क्वेटा शहराच्या मार्गेट परिसरात पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर रिमोट कंट्रोल्ड IED
Related News
जालौन : मोमोजवरून वाद, मुलींची रस्त्यातच तुंबळ मारामारी
रामनाथस्वामी मंदिराच्या दानपेटीतून १ कोटी ४७ लाखांचा निधी
IPL 2025 : अजूनही प्लेऑफ गाठू शकते का CSK?
Weather Update : महाराष्ट्रासह २४ राज्यांमध्ये वादळ-वीज कोसळण्याचा इशारा;
पंजाबमध्ये मोठी कामगिरी
मिर्झापूरमध्ये भीषण अपघात:
भिवंडीत भीषण आग! फर्निचरच्या ७ ते ८ गोदामे जळून खाक
पहलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक सुखरूप परतले
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर ७ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू, ४ जखमी
लाहौर विमानतळावर भीषण आग; सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित
डीजीपीचा नवा आदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा परिणाम हवाई वाहतुकीवर
च्या माध्यमातून भीषण स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात 10 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
बलूच लिबरेशन आर्मीने घेतली जबाबदारी
या स्फोटाची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने स्वीकारली असून त्यांनी हल्ल्याचा
व्हिडिओ देखील जारी केला आहे. BLA च्या म्हणण्यानुसार, त्यांच्या लढवय्यांनी
योजनाबद्ध पद्धतीने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनाला लक्ष्य केलं आणि त्यात 10 सैनिक ठार झाले.
रिमोट कंट्रोल IED चा वापर
या हल्ल्यासाठी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइस (IED) वापरण्यात आले होते.
हल्ला रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आला. स्फोट इतका शक्तिशाली होता की सैन्याचं वाहन पूर्णपणे छिन्नविछिन्न झालं आहे.
राजधानीच्या बाहेरचाच परिसर
हा हल्ला बलूचिस्तानची राजधानी क्वेटा च्या बाहेरील मार्गेट परिसरात झाला.
गेल्या काही महिन्यांपासून या भागात बलूच स्वातंत्र्यवादी संघटनांच्या हालचालींमध्ये वाढ झाली असून,
अनेक वेळा पाक सैन्यावर हल्ले करण्यात आले आहेत.
सतत वाढती अस्थिरता
पाकिस्तानसाठी बलूचिस्तानमधील असंतोष ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. बलूच लिबरेशन आर्मी ही संघटना
स्वातंत्र्याच्या मागणीसाठी लढत आहे आणि वेळोवेळी पाक सैन्यावर टोकाची कारवाई करत आली आहे.
या प्रकारच्या घटनांमुळे पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pakistanchi-paani-kondi/