पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट

पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट

अकोला | प्रतिनिधी

काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात

२७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून,

Related News

संतापाची लाट देशभर उसळली आहे. विविध शहरांमध्ये पाकिस्तानविरोधी आंदोलनं तीव्र होत

असताना अकोल्यातही आज शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

अकोला मुख्य बस स्थानक चौकात शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले

आणि जोरदार घोषणाबाजी करत “पाकिस्तान मुर्दाबाद”, “आतंकवादाचा नाश झाला पाहिजे” अशा घोषणा दिल्या.

शिवसैनिकांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “गोळीबार करणाऱ्या आतंकवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या घालाव्यात.

आता केवळ निषेध नव्हे, तर निर्णायक कारवाईची वेळ आली आहे.”

यावेळी शहरप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशातील अशा प्रकारच्या हल्ल्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/srinagarmadhye-adkalelya-akolyachaya-saha-citizen-layer/

Related News