पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा;

पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा;

नवी दिल्ली :

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात भारतीय नेव्हीचे अधिकारी विनय नरवाल शहीद झाले.

देशभरातून त्यांच्या बलिदानाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या बलिदानाला नमन करत पोस्ट्स आणि श्रद्धांजलीचा वर्षाव सुरू आहे.

Related News

दरम्यान, कश्मीरच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर एका नवविवाहित जोडप्याचा आनंदाने नाचताना

आणि हसताना दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अनेकांनी हा व्हिडीओ शहीद विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नी हिमांशीचा असल्याचा दावा करत भावनिक पोस्ट्स शेअर केल्या.

काही वृत्तवाहिन्यांनी देखील हा व्हिडीओ वापरून बातम्या प्रसारित केल्या.

मात्र, हा व्हिडीओ पूर्णतः खोटा असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ प्रत्यक्षात सोशल मीडिया

इन्फ्लुएंसर यशिका शर्मा आणि आशीष सहरावत यांचा असून,

त्यांनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत स्पष्टता दिली आहे.

यशिका म्हणते, “आम्ही जिवंत आहोत कारण आम्ही त्या हल्ल्याच्या ठिकाणी नव्हतो.

मात्र, आमच्या व्हिडीओला शहीद नेव्ही ऑफिसरचा म्हणून चुकीच्या पद्धतीने वापरलं जात आहे.

अनेक मीडिया चॅनल्सवर आमचे फुटेज दाखवले जात आहेत, ज्याचा त्या दुःखद घटनेशी काहीही संबंध नाही.

गैरसमज टाळण्यासाठी सोशल मीडियावर जबाबदारीने वागा – यशिका शर्मा यांचे आवाहन

या चुकीच्या माहितीनंतर सोशल मीडियावरून मोठा संभ्रम निर्माण झाला. यशिका आणि आशीष

या दोघांनीही लोकांना आणि माध्यमांना जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे.

चुकीच्या माहितीच्या आधारे कोणत्याही व्हिडीओला भावनिक संदर्भ देणे किंवा ती व्यक्ती कोण आहे हे तपासल्याशिवाय पसरवणे,

यामुळे अनावश्यक गोंधळ आणि चुकीचे संदेश समाजात पोहोचतात, असे त्यांनी सांगितले.

Read Also : https://ajinkyabharat.com/union-minister-cr-patil-yanchi-attendance/

Related News