सूरत:
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात सूरतमधील शैलेश
कलथिया यांचा मृत्यू झाला. बुधवारी उशिरा त्यांचे पार्थिव सूरतमध्ये आणण्यात आले
Related News
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
दारूवरील करवाढीविरोधात अकोल्यात वाईन बार बंद; शासनाला बेमुदत बंदीचा इशारा
“विधानसभा अध्यक्ष झोपेत आहेत”; महिला शोषण प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांचा ठिय्या आंदोलनात संताप
राहुल गांधींच्या प्रचार वाहनातून कन्हैया-पप्पूला खाली उतरवले; राजकारणात ‘राजकुमारगिरी’चा आरोप
आयुष्मान कार्डमुळे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; पात्रता आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या!
अकोल्यात श्री सत्यसाई सेवा समितीच्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन
राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात?
अकोल्यात भाजीपाल्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
आणि गुरुवारी त्यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना शेवटचा निरोप दिला.
या अंत्ययात्रेत केंद्रीय गृहमंत्री सी.आर. पाटील, गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी,
शिक्षणमंत्री प्रफुल पनसेरिया, तसेच अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरात सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले होते.
“सुरक्षिततेच्या भरवश्यावर गेलेलो… पण तीच फसवली” – शहीद शैलेश यांची पत्नी शीतल कलथिया यांचा संताप
केंद्रीय मंत्री पाटील यांनी शैलेश यांच्या पत्नी शीतल कलथिया यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
मात्र, यावेळी शीतल यांनी पहलगाममधील असुरक्षिततेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
“सरकार आणि लष्करावर विश्वास ठेवून आम्ही तिथे गेलो. जर तिथे योग्य सुरक्षा व्यवस्था असती,
तर हा हल्ला टाळता आला असता,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
शीतल यांनी पुढे असा आरोप केला की, “हल्ल्यानंतरही खाली असलेल्या सैन्य दलांना वर घडलेल्या घटनेबाबत माहिती नव्हती.
आम्ही अॅम्ब्युलन्स बोलावल्यावरच त्यांना कळलं की काहीतरी गंभीर घडलं आहे.” त्यांच्या या अनुभवाने उपस्थित सर्वांच्या भावना चिघळल्या.
शैलेश यांच्या बहिणीची केंद्र सरकारकडे न्यायाची मागणी
शैलेश यांच्या बहिणीनेही केंद्र सरकारकडे न्यायाची मागणी केली. “आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावला गेला आहे.
आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची विनंती आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
हल्ल्याची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ ने घेतली; केंद्र सरकारकडून कठोर पावले
या भयंकर हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ ने घेतली आहे.
हल्ल्यानंतर केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमारेषा बंद करणे आणि सिंधू जलसंधी स्थगित करणे यांसारखी कठोर पावले उचलली आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/pantpradhan-chitrachya-isharyacha-pakistanchaya-share-market-results/