पोलिसांची वेगवान कारवाई

पोलिसांची वेगवान कारवाई

अकोला (अकोट)

खासबाग शिवारातील संत्रा बागेमध्ये काम करणाऱ्या वयोवृद्ध महिलेवर दरोडा टाकून सोन्या-चांदीचे

दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला अकोट ग्रामीण पोलिसांनी केवळ दोन तासांत अटक केली आहे.

Related News

या आरोपीकडून सुमारे २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महिलेवर एकटं पाहून हल्ला

धारूळ येथील रहिवासी चंद्रकलाबाई किसन डाखोरे (वय ५५) या खासबाग शिवारात संत्र्याच्या

बागेमध्ये मजुरीचे काम करत असताना, सुमित सुनील डवंगे (वय १८, रा. शिवपूर)

या तरुणाने एकटे पाहून त्यांच्या अंगावरील सुमारे ३३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटले.

पोलिसांची तत्परता; आरोपी गजाआड

घटनेची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून शोधमोहीम राबवली.

विशेष पथकाच्या मदतीने आरोपीला केवळ दोन तासांत ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपीकडून २१ हजार रुपयांचे दागिने व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-akoliyache-31-tourist-srinagarmadhyaye-adkale/

Related News