पहलगाम दहशतवादी हल्ला : संशयितांचे स्केच जारी, संशयितांची कसून चौकशी

पहलगाम दहशतवादी हल्ला : संशयितांचे स्केच जारी, संशयितांची कसून चौकशी

श्रीनगर | 23 एप्रिल 2025 — जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी

हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून,

यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे.

Related News

दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम

हल्ल्यानंतर सुरक्षादलांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली आहे.

लष्कर, सीआरपीएफ, एसओजी आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे

(स्केच) जारी केली आहेत. या स्केचेस पर्यटकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे

तयार करण्यात आली असून, त्यात आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलह यांचा समावेश आहे.

NIA आणि फॉरेन्सिक पथकांची तपासणी

एनआयएच (राष्ट्रीय तपास संस्था) चे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ श्रीनगरला दाखल झाले आहेत.

घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहेत. संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील हानी: ६ मृत, ३ जखमी

हल्ल्यात महाराष्ट्रातील डोंबिवली, पुणे आणि पनवेल येथील एकूण सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांची नावे:

  1. अतुल मोने – डोंबिवली

  2. संजय लेले – डोंबिवली

  3. हेमंत जोशी – डोंबिवली

  4. संतोष जगदाळे – पुणे

  5. कौस्तुभ गणबोटे – पुणे

  6. दिलीप देसले – पनवेल

जखमींची नावे:

  1. एस. बालचंद्रू

  2. सुबोध पाटील

  3. शोबीत पटेल

सरकार आणि प्रशासनाच्या वतीने हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत देण्यात येईल,

असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/dupari-lagalelya-fierce-agit-ghar-jun-khak/

Related News