दुपारी लागलेल्या भीषण आगीत घर जळून खाक…

दुपारी लागलेल्या भीषण आगीत घर जळून खाक...

अकोला जिल्ह्यातील वल्लभनगर परिसरात आज दुपारी एका घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

या आगीत घराचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून, घरमालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

प्राथमिक तपासणीत ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related News

आगीत घरातील आवश्यक वस्तू, कपडे, फर्निचर यांच्यासह काही रोकड आणि दागिनेसुद्धा आगीच्या भक्षस्थानी पडले.

या नुकसानीची किंमत लाखोंच्या घरात असल्याचा अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले.

जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

स्थानिक प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून,

नुकसानग्रस्त कुटुंबाला शक्य ती मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/shiv-sena-thackeray-gut-che-jilhapramukh-gopal-datkar-arj-fetalla/

Related News