तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;

पातूरच्या शेतकऱ्याची अनोखी शक्कल

प्रतिनिधी, अकोला
सध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,

याचा परिणाम फक्त माणसांवरच नव्हे तर प्राण्यांवरही होत आहे.

Related News

विशेषतः पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोंबड्यांच्या आरोग्यावर उष्णतेचा विपरीत परिणाम

उष्णतेमुळे कोंबड्यांचे अन्न सेवन कमी होते, परिणामी त्यांचे वजन घटते आणि अंडी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.

काही वेळा तापमान अत्यंत वाढल्यास कोंबड्यांचा मृत्यूही होतो. या गंभीर परिस्थितीत

अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शेतकरी सैय्यद रियाज यांनी

आपल्या पोल्ट्री फार्मवर अनोखी शक्कल लढवून कोंबड्यांचे प्राण वाचवले आहेत.

८ हजार कोंबड्यांचा संरक्षणासाठी खास उपाययोजना

सैय्यद रियाज यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ८ हजार कोंबड्यांचे संगोपन केले जाते.

उन्हापासून या पक्षांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी फार्ममध्ये वॉटर स्प्रिंकलर, ६ एअर कुलर,

आणि बाहेरील गरम हवा आत शिरू नये यासाठी हिरव्या जाळ्या (नेट्स) बसवलेल्या आहेत.

गरम हवेला ‘नो एंट्री’!

फार्मभोवती नेट लावल्यामुळे बाहेरील उष्ण वाऱ्याचा अडथळा निर्माण होतो,

आणि आतील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

यामुळे कोंबड्यांना आवश्यक तेवढे थंड वातावरण मिळून उत्पादन व आरोग्य दोन्ही सुरळीत राहतात.

Read Also : https://ajinkyabharat.com/makadachanya-talkyamadhyaye-fierce-justification-rastyavarch-december-gangwar/

Related News